Xiaomi Redmi 8 लवकरच भारतात

नवी दिल्ली: महाराष्ट्र News 24 वृत्त

Xiaomi Redmi 8 येत्या ९ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच होणार असल्याच शाओमी कंपनीने नुकतच जाहीर केले आहे.

चीनची कंपनी शाओमी (Xiaomi) भारतात आणखी एक स्मार्टफोन आणणार असून  हा स्मार्टफोन Redmi 8 आहे, कारण एन्ट्री-लेवल 8A च्या लाँचच्या दरम्यान शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी हे स्पष्ट केले की Redmi 8 पुढील इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. आता कंपनीने हे जाहीर केले आहे की Redmi 8 येत्या ९ ऑक्टोबर रोजी भारतात लाँच होणार आहे.  हा फोन बॅटरी आणि कॅमेऱ्याच्या बाबतीत दमदार असेल. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, रेडमी ८ स्मार्टफोनच्या मागे ग्लॉसी प्लास्टिकसारखं फिनिश असू शकतं. ड्युअल कॅमेरा सेट अप असू शकतो. फोनच्या रिअरमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील असू शकतो. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी एका ट्विटद्वारे स्मार्टफोन लाँचिंगची माहिती दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत